बाबासाहेब नेहमी प्रेरणा देतात...

आपल्या सर्व वाचकांना सप्रेम जय भीम. 

आजचं जीवन अतिशय तणावपूर्ण असून, समाजिक, आर्थिक तणाव नेहमीच जाणवत असतो. एक वेगळीच अस्थिरता नेहमी जाणवत असते. अशा परिस्थितीत देखील आपण समाधान शोधत राहतो. आपले कुटुंब आपले मित्र ह्यामध्ये कुठे ना कुठे आपला तणाव दूर करत राहतात. पण सर्वांच्या बाबतीत असं घडत नाही. 

काही जणांच्या बाबतीत समस्या सोडविण्यासाठी, ताण तणाव दूर करण्यासाठी, आपले प्रोब्लेम शेयर करण्यासाठी कोणीच नसतं अशा वेळी मानसिक त्रास वाढत जातो एकटेपणा वाढतं जातो, आयुष्यात काहीच शिल्लक नाही ही भावना वाढीस लागते. प्रोब्लेम ईतके अधिक असतात की आत्महत्या करण्याइतपत विचार पोचतात.



अशा वेळी फक्त बाबासाहेब डोळ्यापुढे ठेवले ना तर हे प्रोब्लेम वगेरे सर्व काही शुल्लक वाटतं. बाबासाहेबांमुळे आज ताठ मानेने जगतोय, पैसा कमवतोय, चार माणसात नाव होतय. हेच जर बाबासाहेब नसते ना तर आहे ते दिवस सुध्दा पहायला मिळाले नसते. म्हणून सदैव एक गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेबांनी आपल्याला सुंदर आयुष्य, सुंदर जीवन जगण्याची संधी दिली आहे ती अशी व्यर्थ जाता कामा नये. कितीही असतील प्रोब्लेम तरी आपलं सोलूशन एकच - बाबासाहेब. 



Author - सुयश के.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post