गौतम बुद्ध प्रवचन सभेला आले आणि एकदम शांतपणे बसून राहिले. त्यांच्या मौनामुळे शिष्य मंडळी चिंतेत होती, त्यांची तब्येत बिघडली की काय ही भिती वाटत होती. अखेर एका शिष्याने विचारले, "गुरूदेव, आज तुम्ही इतके गप्प का आहात?" बुध्द काही बोलले नाही.
तेव्हा दुसऱ्या शिष्याने पुन्हा विचारले - "गुरुदेव ! तुमची तब्येत बरी आहे ना?" बुद्ध अजूनही गप्पच राहिले.
त्यात बाहेरून एका व्यक्ती जोर-जोरात ओरडत होता - "तुम्ही मला आज प्रवचनसभेत का येऊ दिले नाही?"
बुद्धांनी उत्तर दिले नाही आणि डोळे मिटून ध्यान करत राहीले.
बाहेर उभा असणारा व्यक्ती मोठ्याने म्हणाला - "मला प्रवचनसभेत येण्याची परवानगी का दिली जात नाही?"
सभामंडपात बसलेल्या बुद्धाच्या शिष्यांपैकी एकाने त्याला आधार दिला त्याला शांत केले आणि बुध्दांना म्हणाला - "गुरुदेव ! त्याला प्रवचन सभेत येण्याची परवानगी द्या."
महात्मा बुद्धांनी डोळे उघडले आणि म्हणाले - "नाही, त्याला परवानगी दिली जाणार नाही कारण तो अस्पृश्य आहे."
"अस्पृश्य ! पण का?" हे ऐकून सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले की गुरूदेव ही अस्पृश्यता कधीपासून मानू लागले?
महात्मा बुद्धांनी आपल्या शिष्यांना समजावताना सांगितले की,
"हो, तो अस्पृश्य आहे. तो भांडण वाद-विवाद करून आला आहे, रागामुळे जीवनातील शांतता बिघडते. संतापलेला माणूस मानसिक हिंसाचार करतो. मानसिक हिंसा करणारी व्यक्ती शारिरीक हिंसा करते. या रागामुळेच तो अस्पृश्य आहे. जो रागाचा अतिरेक करतो तो अस्पृश्य असतो कारण त्याच्या विचारांचा इतरांवरही प्रभाव पडतो. इतरांच्या आयुष्यातही अशांतता निर्माण होते. म्हणून त्याने आजच्या सभेपासून दूर राहिले पाहिजे. त्याने तिथे उभे राहून पश्चात्तापाच्या अग्नीत स्वतःला शुद्ध केले पाहिजे."
शिष्यांना समजले की अस्पृश्यता म्हणजे काय आणि अस्पृश्य कोण?

0 टिप्पण्या