बाबासाहेबांची जयंती म्हटलं की एक वेगळाच आनंद वाटतो, अशी उर्जा, अशी सकारात्मकता येते, उत्साह आणि आतूरता वाटते चेहर्‍यावर वेगळाच आनंद असतो जो येरव्ही कधी दिसत नाही.

जयंती म्हटलं की आपली गाणी तर वाजणार आणि गाणी म्हटलं की डीजे लागणार. आता डीजे तर पाहिजेच आम्हाला डीजे चा विरोध करायला काय मी काही सांगत नाही किंवा माझा काही विरोध नाही. पण जे प्रकार चालू आहेत ते पाहता निदान डीजे वर सायरन, हॉर्न तरी वाजवायला नको, लाखो रुपये खर्च करून वाजवताय काय तर चुई-चुई,पुई-पुई. 

 
शहर हादरवायचं किंवा भुकंप करायचा असेल तर तो ही करा पण निदान जयंती मध्ये सहभागी होणार्‍यांची कानं निट राहतील हे तर बघा. नुसत्या पिपान्या वाजवायला लाखो रुपये खर्च करतो आपण?

हे असले हॉर्न वाजवून साध्य काय करताय?
जगात प्रशंसनीय गाणी संपली आहेत का?
बाबासाहेबांच्या गाण्यांमध्ये कमतरता आहे का?
नेमकं कमी काय राहतंय जे आम्हाला हाॅर्न आणि सायरन ऐकवले जातात.
लावा गाणी, नाचुन आनंद साजरा करा पण निदान थोडं भान तर ठेवा आपण करतोय काय. हा कसला प्रकार चालू आहे मला तर काही समजत नाही आणि पटतं तर बिलकुल नाही. जातो जयंती मध्ये आनंद साजरा करायला आणि येतो हे असले बिनडोक उद्योग पाहून. दर वर्षी हेच पहायला भेटतं. ना कसली सामाजिक बांधिलकी, ना कसली बाबांच्या संघर्षमय दिवसांची आठवण, ना कसली सुधारणा.
ऐवढे डीजे लावण्यापेक्षा रेल्वेचे हाॅर्न लावा ते जास्त परवडतील भावांनो. पैशांची बचत आणि नुसता आवाज..चुई चुई चुई चुई...

महाराष्ट्रातील काही भागात ज्या पद्धतीने जयंती साजरी केली जाते त्यात सुधारणा नक्कीच आवश्यक आहे.

जय भीम !!!